Ad will apear here
Next
डॉ. भक्ती दातार यांच्या ‘से चीज..!’ या पुस्तकाचे प्रकाशन; दंत, मुख आरोग्याचे सर्वंकष मार्गदर्शन
महिलांच्या मुख आरोग्यासंदर्भात विशेष प्रकरण

पुस्तकाचे प्रकाशन करताना (डावीकडून) डॉ. रत्नावली दातार, डॉ. भालचंद्र दीक्षित, डॉ. विजय फडके, डॉ. दीपक कुलकर्णी, डॉ. वैजयंती खानविलकर, डॉ. जयंत नवरंगे, सुप्रिया लिमये, डॉ. भक्ती दातार.

पुणे : ओठ, जीभ, दात, जबडा यांचे आरोग्य शारीरिक व मानसिक आरोग्याइतकेच महत्त्वाचे असते, हे लक्षात घेऊन प्रसिद्ध दंतशल्यचिकित्सातज्ज्ञ डॉ. भक्ती दातार यांनी लिहिलेल्या ‘से चीज..!’ या इंग्रजी पुस्तकाचे आणि ई-बुकचे प्रकाशन महिला दिनी पुण्यात करण्यात आले. पुरुष व मुले यांच्याबरोबरच विविध वयोगटातील महिलांच्या मुख आरोग्याची माहिती देणारे स्वतंत्र प्रकरण या पुस्तकात छापण्यात आले आहे. बुकगंगा पब्लिकेशन्सतर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.

मुखाचे आरोग्य या क्षेत्रातील अमूल्य पुस्तक लिहिल्याबद्दल डॉ. दातार यांचे ज्येष्ठ ओरल मॅक्सिलोफेशियल सर्जन (जबड्याच्या गंभीर आजारांचे तज्ज्ञ) व समारंभाचे अध्यक्ष डॉ. दीपक कुलकर्णी यांनी अभिनंदन केले. पुण्यातील भारतीय वैद्यक संघटनेच्या सभागृहात (आयएमए) आठ मार्च रोजी हा कार्यक्रम झाला.


ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वैजयंती खानविलकर, तसेच डॉ. जयंत नवरंगे, ज्येष्ठ डॉक्टर विजय फडके, डॉ. रत्नावली दातार, भारतीय वैद्यक संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ. भालचंद्र दीक्षित आणि ‘बुकगंगा’च्या संचालिका सुप्रिया लिमये इत्यादी अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते. डॉ. भक्ती दातार, तसेच डॉ. दीक्षित कुटुंब व त्यांचे विविध क्षेत्रातील मित्र आणि नातेवाईक यांच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम हृद्य झाला. डॉ. भक्ती दातार यांच्या मातोश्री डॉ. अंजली दीक्षित यांनी सूत्रसंचालन केले, तर पती डॉ. समीर दातार यांनी आभार मानले.

डॉ. दीपक कुलकर्णी म्हणाले, ‘मुखाच्या आरोग्यावर अत्यंत कष्टपूर्वक संशोधन करून, सामाजिक बांधिलकीतून जगभरातील माहिती कल्पकतेने एकत्र आणण्याचे मोठे काम डॉ. दातार यांनी केले आहे. म्हणूनच ‘से चीज..!’ या पुस्तकाने सर्वसामान्यांच्या ज्ञानात मोलाची भर घातली आहे. या पुस्तकात दातांचे व्यायाम (डेंटल जिम्नॅशियम), तसेच नव्याने संशोधन चालू असलेला वृद्धांचे मुख आरोग्य हा विषय, आदींवरची माहितीही अत्यंत विस्ताराने दिली आहे.

‘या पुस्तकामध्ये दिलेली स्त्रीच्या मौखिक आरोग्याविषयीची नावीन्यपूर्ण माहिती थक्क करणारी आहे,’ असे डॉ. खानविलकर यांनी सांगितले. हे पुस्तक प्रकाशित करणाऱ्या बुकगंगा पब्लिकेशन्सचे त्यांनी अभिनंदन केले. त्या म्हणाल्या, ‘महिलांच्या मुखआरोग्यासाठी तरी हे पुस्तक भावी मातांनी नक्कीच वाचावे. ‘बुकगंगा’चे अभिनंदन! आज केवळ इंग्रजी वाचणाऱ्या पिढीसाठी हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यातले ज्ञानभांडार रोचक, रंजक, सुंदर ओघवती ऐटबाज शैली आणि अत्यंत नजाकतीने उलगडले आहे. यातून ‘फिजिकल फिटनेस’बरोबरच ‘डेंटल फिटनेसबद्दल’ही जागृती व्हायला निश्चित मदत होईल.’

‘से चीज..!’ या पुस्तकाची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिणारे डॉ. जयंत नवरंगे म्हणाले, ‘गर्भधारणा ते प्रत्यक्ष प्रसूती या काळात स्त्रीमध्ये मोठे बदल होत असतात. अशा परिस्थितीत आपल्या दातांचे आरोग्य कसे ठेवता येईल याची क्रमवार माहिती डॉ. दातार यांनी पुस्तकात दिली आहे. अत्यंत नावीन्यपूर्ण पद्धतीने लिहिलेल्या या पुस्तकामुळे वाचकाला मुखआरोग्याबद्दल भरपूर माहिती मिळेल. या पुस्तकाने वैयक्तिक पातळीवर, साहित्यात तसेच वैद्यकीय क्षेत्रात मोलाची भर घातली आहे. त्यामुळे त्याचे मराठीत व अन्य देशी भाषांमध्येही भाषांतर व्हायला हवे.’

डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, ‘दात हे शरीराचे रक्षक आहेत. तरी दातांबद्दल आपल्या मनात खूप गैरसमज आहेत. यातून दातांबद्दल वैद्यकीय अभ्यासक्रमात मुले चार वर्षे काय शिकतात, असा चुकीचा प्रश्न नेहमी विचारला जाणार नाही. हे पुस्तक या साऱ्या प्रश्नांचे उत्तर आहे.’

‘बुकगंगा’च्या संचालिका सुप्रिया लिमये यांनी ‘बुकगंगा’च्या स्थापनेपासून केलेल्या कामाचा धावता आढावा घेतला. त्या म्हणाल्या, ‘पुस्तकाच्या निर्मिती करणाऱ्या ‘बुकगंगा’च्या टीममध्ये कोकणातील साखरपा या गावातील मुली व महिलांचा सहभाग आहे. ई-बुक, प्रिंटेड बुक आणि ऑडिओ बुक या क्षेत्रात ‘बुकगंगा’ने आतापर्यंत १९३१पासूनची हजारो मराठी पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध करून दिली आहेत. डॉ. दातार यांचे हे पुस्तक खेड्यातील विद्यार्थ्यांपर्यंत नक्कीच पोहोचवता येईल. या पुस्तकात दातांच्या आरोग्याची माहिती प्रभावीपणे देण्यासाठी अनेक उपयुक्त फोटो व आकृत्या देण्यात आल्या आहेत. लहान वयातील आपल्या मुलांमध्ये मुखआरोग्याबाबत जागृती करण्यासाठी व त्यांना भेट देण्यासाठी पालकांनी हे उपयुक्त पुस्तक विकत घ्यायला हवे.’

लेखिका डॉ. भक्ती दातार म्हणाल्या, ‘या पुस्तकावर मी गेली तीन वर्षे सातत्याने काम केले असून, रोगमुक्त मौखिक आरोग्य ही एक मोठी गुंतवणूक आहे. बेफिकीर वृत्तीमुळे या विषयातील गांभीर्य मुलांना समजत नाही. ते समजावून देण्याची गरज आहे.’

‘या पुस्तकाच्या निर्मितीत ‘बुकगंगा’बरोबरचा प्रवास खूप सुखकर झाला. अनेक तज्ज्ञांच्या मदतीने व त्यांच्या मौलिक सूचनांचा आवलंब करून या पुस्तकाच्या कच्च्या प्रतीत वेळोवेळी बदल करण्यात आले. या २४० पानी पुस्तकाचे समर्पक मुखपृष्ठ व आतली डिझाइन्स डॉ. समीर दातार यांची आहेत,’ असेही डॉ. दातार यांनी नमूद केले.

स्टँडर्ड व जेन्युइन स्माइल आणि माधुरी दीक्षित...

‘नेहमीचे (स्टँडर्ड) व आतमधून येणारे स्मितहास्य (जेन्युइन स्माइल) यातील फरक ‘से चीज..!’मध्ये दाखवला आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचे स्मितहास्य जेन्यूइन स्माइलमध्ये मोडते,’ असे मत प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष डॉ. दीपक कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ‘जगाला जिंकणाऱ्या कुंदकळ्यांसारख्या सुंदर दंतपंक्ती प्रत्येकाकडेच हव्यात. म्हणूनच ‘सो स्माइल आणि से चीज!,’ असे डॉ. वैजयंती खानविलकर म्हणाल्या. 

(‘से चीज’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी किंवा त्याचे ई-बुक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZVCCK
Similar Posts
से चीज : दंत, मौखिक आरोग्याविषयीच्या डॉ. भक्ती दातार यांच्या पुस्तकाचे आठ मार्चला प्रकाशन पुणे : माणसाचा चेहरा प्रसन्न असला, की समोरच्यावर प्रभाव पाडण्याचे अर्धे-अधिक काम होऊन जाते. ही प्रसन्नता मनावर अवलंबून असते हे खरेच; पण बाह्य सौंदर्याचा विचार करायचा झाल्यास या प्रसन्नतेत सर्वांत महत्त्वाची भूमिका बजावतात ते सुंदर दात. दात सुंदर आणि निरोगी राखण्यासाठी, तसेच संपूर्ण मौखिक आरोग्यच चांगले
‘से चीज..!’ ... डॉ. भक्ती दातार सांगत आहेत दंतआरोग्याविषयी... (व्हिडिओ) सहा मार्च रोजी नॅशनल डेन्टिस्ट डे अर्थात राष्ट्रीय दंतरोगतज्ञ दिवस असतो. ओठ, जीभ, दात, जबडा यांचे आरोग्य शारीरिक व मानसिक आरोग्याइतकेच महत्त्वाचे असते, हे लक्षात घेऊन पुण्यातील प्रसिद्ध दंतशल्यचिकित्सातज्ज्ञ डॉ. भक्ती दातार यांनी ‘से चीज..!’ हे मार्गदर्शनपर इंग्रजी पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक आणि ई-बुक बुकगंगा पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित झाले आहे
‘असंच होतं ना तुलाही’च्या दुसऱ्या आवृत्तीचे २३ जानेवारीला पुण्यात प्रकाशन पुणे : सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात पुस्तके वाचण्याचे प्रमाण कमी झाले आहे, त्याचा परिणाम पुस्तकांच्या विक्रीवरही झालाय. त्यातही कवितासंग्रह विकत घेऊन वाचण्याचे प्रमाण तर अगदीच कमी आहे... अशी आणि अशा आशयाची वाक्ये आपल्याला ऐकायला मिळतात. काही प्रमाणात ती खरीही आहेत. मिलिंद जोशी यांच्या ‘असंच होतं ना
आयुष्यातील समस्यांची उकल शोधणे हाच अध्यात्म मार्ग पुणे : ‘प्रत्येकाच्या आयुष्यात समस्या आहेतच. त्या कुणालाही चुकलेल्या नाहीत. आपला जन्म कशासाठी झाला असा प्रश्न अनेकांना पडतो, तर त्याचे उत्तर ‘या समस्या सोडवण्यासाठीच’ असे आहे. समस्या संपल्या की जन्मच संपला. या प्रश्नांची उत्तरे शोधणे किंवा समस्यांची उकल शोधणे हेच खरे अध्यात्म आहे. गहन रूप असलेले अध्यात्म

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language